राहुल गांधी नव्हे, राहुल जिना नाव शोभून दिसेल; भाजपचा पलटवार


वेब टीम : दिल्ली
राहुल गांधी यांनी वाद ओढावून घेत ‘रेप इन इंडिया’ अशी टिप्पणी केल्यामुळे, या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी शुक्रवारी भाजपकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील रामलीला मैदानावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपला चांगले फटकारले.

एखादी सत्य गोष्ट बोलण्यासाठी मी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता माफी मागणार नाही. तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनीही राहुल गांधींवर सडकून टीका केली. तर खासदार जी.व्ही.एल. नरसिम्हा यांनीही राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले.

तुम्हाला राहुल जिना हे नाव शोभून दिसेल. मुस्लिमांचे लांगुलचालन आणि तुमची मानसिकता पाहता तुम्ही सावरकर नव्हे तर मोहम्मद अली जिना यांचे वारसदार ठरता, असे जी. व्ही. एल. नरसिम्हा यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post