सुट्टी घेण्यावरून झाले वाद; जवानानेच केला पाच जवानांचा घात


वेब टीम : रांची
इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलाच्या(ITBP) छावणीत बुधवारी एक विचित्र घटना घडली आहे. एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात पाच जवान ठार, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

यानंतर त्या जवानाने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. छत्तीसगढ मधल्या नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. जवानांमध्ये सुट्टीवरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

नारायणपूर येथील पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार आयटीबीपीच्या बी/४५ बटालियनच्या केडनर येथील कॅम्पमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास वाद झाला.

या वादातून झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला तर दोन जवान जखमी झाले. रहमान खान या कॉन्स्टेबलने आपल्या पाच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. जखमी जवानांना उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post