बंडखोरी नाही, कोणत्या मार्गाने जायचं हे १२ डिसेंबरला सांगणार : पंकजा मुंडे


वेब टीम : बीड
दबावतंत्रासाठी मी फेसबुक पोस्ट केली नाही. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आला.

चुकीच्या बातम्यांमुळे मी व्यथित झाले. पक्षाशी मी बांधील आहे. पंकजा मुंडे या भाजप सोडणार, या केवळ अफवा असून पंकजा मुंडे या कालही भाजपच्या नेत्या होत्या, आजही आहेत आणि उद्याही असतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच स्पष्ट केले होते.

मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आला. चुकीच्या बातम्यांमुळे मी व्यथित झाले. पक्षाशी मी बांधील आहे.

मी भाजप पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवण्यात आल्या, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांनी – कोणत्या मार्गाने जायचं हे १२ डिसेंबरला सांगणार, अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती.

आज विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच घरी जेवणासाठीचे आमंत्रण दिले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे. त्या पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या व सर्व गोष्टींचा खुलासा केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post