पाकिस्तानचे भारताच्या विरोधात छुपे युद्ध : राजनाथ सिंग


वेब टीम : पुणे
पाकिस्तान भारताला पारंपरिक युद्धात हरवू शकत नाही हे त्यांनी चांगले ओळखले आहे. त्यामुळे पाकिस्ताने भारता विरोधीत छुपे युद्ध पुकारले आहे.

आज मी जबाबदारीने सांगतो भारत दहशतवाद सारख्या छुप्या युद्धात ही पाकिस्तानला शिकस्त करू शकतो.

छुपे युद्ध करूनही पाकिस्तानच्या हाती काही लागणार नसल्याचे मत केद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकाच्या १३७ व्या तुकडीचा दिक्षांत समारंभ शनिवार पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.

यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के.सैनी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंह म्हणाले, भारताने नेहमी इतर राष्ट्र सोबत शांती पूर्ण, सौदार्यपूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत.

कोणाच्याही भूमीवर आक्रमण करण्याचा आमचा उद्देश नाही मात्र जर कोणी आमच्या वर आक्रमण करेल तर त्याला सडेतोड उत्तर देऊ हा आमचा संकल्प आहे.

आम्ही देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी, सार्वभौम टिकविण्यासाठी सज्ज आहोत.

मात्र जेव्हा कुठला देश त्याच्या भुमीवर दहशतवाद आसरा देत असेल आणि त्याचा वापर भारतावर आक्रमण करण्यासाठी वापर करत असेल तर अशा राष्ट्राला आम्ही सडेतोड उत्तर देऊ.

आम्ही त्याचा योग्य प्रकारे सामना करू असे केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post