सोनई हत्याकांड : पाच जणांची फाशी कायम; एक निर्दोष


वेब टीम : मुंबई
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर येथील सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली.

या हत्याकांडातील दुसरा आरोपी अशोक नवगिरेची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. अहमदनगरच्या सोनई गावात २०१३मध्ये हे हत्याकांड घडले.

हत्याकांडानंतर संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या आधी २०१८ मध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयाने सहा जणांना फाशीची शिक्षा दिली होती.

या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

त्यावर आज सुनावणी झाली असता न्यायालयाने प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाचजणांना फाशीची शिक्षा सुनावली असून अशोक नवगिरे याची पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

प्रेमप्रकरणातून धुळे जिल्ह्यातील तीन दलित मजूर युवकांची हत्या करून त्यांचे मृतदेहांचे तुकडे करून सेप्टीक टँकमध्ये टाकले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post