अफगाणिस्तान : दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांची मोठी कारवाई; १०० जणांचा खात्मा


वेब टीम : काबुल 
अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत चोवीस तासांत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, ४५ हून अधिक दहशतवादी जखमी असल्याचे वृत्त आहे.

सुरक्षा दलांनी १५ राज्यांत १८ ठिकाणी ही मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत पाच दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, मागच्या २४ तासांत अफगाणिस्तानमध्ये १५ प्रांतात १८ मोहिमा राबविण्यात आल्या.

यामध्ये १०९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर, ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत. तर, पाच संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. हे सर्व दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते, याची कोणतीही माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली नाही.

याआधी, ७ डिसेंबर रोजी अफगाणच्या सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत १५ दहशवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते. या कारवाईनंतर तालिबानने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.

त्याआधी,२४ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानच्या उत्तरी प्रांतात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्याच धुमश्चक्री झाली होती. यामध्ये दोन जवान मारले गेले. तर, २४ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

उत्तरी कुंदुज प्रांतात १९ नोव्हेंबर रोजी हवाई दलाच्या हल्ल्यात १४ दहशतवादी मारले गेले होते. यामध्ये हमजा नावाने ओळखला जाणार्‍या स्थानिक म्होरक्याचा सहकारी एजातुल्ला आणि त्यांच्या दोन साथीदारांचा समावेश होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post