भारतात सावधगिरी बाळगा; अमेरिका, ब्रिटनचे पर्यटकांना निर्देश


वेब टीम : दिल्ली
नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि ब्रिटनने भारतात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहे. ईशान्येकडील राज्यात नागरिकत्व कायद्याला विरोध होत आहे.

अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने सुरू आहेत. वाहतूक सेवेवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. अमेरिकेने तूर्तास भारताच्या ईशान्येकडील राज्यात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननेदेखील असाच सल्ला दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये परवा मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवर नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या काही जवानांना मारहाण केली.

तसेच, रेल्वेच्या कार्यालयासह काही ठिकाणी जाळपोळ केली. कोरोमंडल एक्सप्रेसवर दगडफेक करण्याबरोबरच रेल्वे कर्मचार्‍यांना मारहाण केली. तसेच, उलबेरिया स्टेशनवरील रेल्वे रुळाचे नुकसान केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post