अण्णा हजारेंचे आंदोलन सुरु; निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची मागणी


वेब टीम : अहमदनगर 
निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी या व इतर विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी (दि.20) सकाळी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथील संत यादवबाबा मंदिरात जाऊन यादवबाबांचे दर्शन घेऊन मौन आंदोलनास प्रारंभ केला.

दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुध्दा आरोपींना अद्यापही फाशी देण्यात आली नाही. या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी महिला व युवतींवरील अत्याचार करणार्‍या नराधमांचे धाडस वाढत आहे.

असे प्रकार हे दुर्दैवी आहेत. 2012 पासून संसदेत ज्युडीसीईल हा कायदा प्रलंबित आहे. तो कायदा झाल्यास न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने सुटण्यास मदत होईल.

पोलीस ठाण्यात महिलांना एखादी तक्रार दाखल करायची झाल्यास तेथे पुरुष कर्मचारी, अधिकारी असल्याने महिलांना माहिती सांगण्यात अडचणी येतात.

त्यामुळे पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी महिला कर्मचारी, अधिकारी यांना नेमण्यात यावे. राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post