भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझादला दिल्ली मध्ये अटक

file photo

वेब टीम : दिल्ली
दरियागंज परिसरामध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी १५ जणांना अटक झाली. या संदर्भात पोलिसांनी शनिवारी सकाळी माहिती दिली. सुरुवातीला दहा जणांना पकडले होते.

त्यानंतर पाच जणांना अटक केली. तर भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझादला सकाळी जामा मशिदीच्या जवळ ताब्यात घेतले.

देशभरात नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध होत आहे. दरियागंजमध्येही शुक्रवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या प्रकरणी १५ जणांना अटक केली आहे. सुरुवातीला दहा जणांना अटक केली होती.

त्यानंतर पाच जणांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी सकाळी दिली. आंदोलन आणि हिंसाचार प्रकरणी एकूण ४० जणांना ताब्यात घेतले होते.

त्यातील आठ अल्पवयीनांना शनिवारी सकाळी सोडले.ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी १५ जणांना अटक केली आहे. अजून काही जणांना अटक होईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post