घातक शस्रांसह दरोडेखोरांची टोळी पकडली


वेब टीम : अहमदनगर
घातक शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत मोटारसायकलवरून राहुरी परिसराकडे जाणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांना सापळा रचुन अटक केली. ही कारवाई शनिशिंगणापुर फाटा येथे शनिवारी (दि.21) केली.

या कारवाईत सागर अण्णासाहेब भांड (वय 24, रा. नागापुर), किरण रावसाहेब जरे (वय 33, रा. नालेगाव), अमोल जगन कदम (वय 28, रा. दरेवाडी, सोलापुर रोड), श्रीकांत सुरेश लाहुंडे (वय 19, रा. राहुरी), अल्लाउद्दीन इब्राहिम शेख (वय 23, रा. अंबिकानगर, राहाता), दीपक रविकांत उपाध्याय (वय 25, रा. नवनागापुर, अ.नगर) यांना अटक केली.

त्यांच्याकडुन पल्सर मोटारसाकल (क्र. एमएच 16 सी जे 5274) करीष्मा मोटारसायकल (क्र. एमएच 12 एफ व्ही 8295) लोखंडी कोयता, सत्तुर, लाकडी दांडके, सुरा, नॉयलॉन दोरी, मिरची पुड व सहा मोबाईल असा 1 लाख 21 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान नितीन मच्छिंद्र माळी (रा. नेवासा) हा पसार झाला.

याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post