औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात नागरिकत्व कायद्याविरोधात भव्य मोर्चा

फाइल फोटो 

वेब टीम : औरंगाबाद
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलन पेटले आहे . हेच चित्र औरंगाबादमध्येही दिसले. औरंगाबादमध्ये या दोन्ही कायद्यांना विरोध करण्यासाठी एक लाखाहून अधिक नागरिक एकत्र जमले .

औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली होती. शुक्रवारच्या नमाजानंतर सर्व मुस्लिम नागरिकांनी, विविध शहरात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी तत्काळ शहरात तब्बल ७२ दिवसांसाठी कलम १४४ लागू करत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली.

पोलिसांनी ७२ दिवसांसाठी शहरात जमावबंदी केल्याने कुठल्याही पक्ष किंवा संघटनेला आंदोलन करता येणार नाही. नागरिक संविधानातील अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने मोर्चा करत असताना पोलिसांनी जमावबंदी लागू करणे विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post