अहमदनगर : त्रासलेल्या नागरिकांनीच पकडून दिले भटके कुत्रे


वेब टीम : अहमदनगर
मोकाट जनावरे, भटकी कुत्री यासह घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता अशा नागरी समस्यांमुळे तारकपूर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

या समस्यांनी हैराण झालेल्या नागरिकांनी अखेर गुरुवारी (दि. 26) दुपारी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाशी संपर्क साधून पथक बोलावून घेऊन परिसरातील मोकाट कुत्रे पकडून दिली.

शहरातील तारकपूर परिसर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा या परिसरात मोठा वावर वाढला आहे. त्यातच अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. या अस्वच्छतेमुळे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा मोठा वावर वाढला आहे.

त्यामुळे अखेर या परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासन तसेच नगरसेवकांचे मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे अखेर या परिसरातील नागरिकांनी गुरुवारी (दि.26) मनपाच्या पथकाशी संपर्क साधला. या पथकाला बोलावून घेत परिसरातील कुत्रे पकडून दिले. या कारवाईत 7 कुत्रे पकडण्यात आली.

त्याचबरोबर नागरिकांनी मनपाच्या सफाई कामगारांची वाट न पाहता परिसरात स्वत:हून स्वच्छता मोहिम हाती घेतली. नगरसेवक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.

यावेळी मनोहर खुबचंदानी, बल्लू सचदेव, राजेश महाराज, अमित कांजन, विजय सहानी, दीपक काबरा आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post