औरंगाबाद : भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


वेब टीम : औरंगाबाद
संजयनगर, मुकुंदवाडी येथे भाजपचे सोनू पवार व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, पूर्वचे अध्यक्ष बाळासाहेब हरबक पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शरद पवार यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असून, यापुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार असल्याचे सोनू पाटील यांनी जाहीर केले.

दीपक परेराव, प्रशांत जगताप, राहुल कावरे, गजानन सुरोसे, शैलेश भालेराव, मुकुंद घोडके, अक्षय पडूळ, विशाल गायकवाड, राज मोरे, अजय घुसळे, कपिल गिरी, भारत सुरडकर, शुभम मोरे, बाळा काळे, लखन सोनटक्के, आकाश मोरे, रोहित बनगावकर, किरण सोदे, आनंद दाभाडे, बिलाल शेख, किरण चिंनूलकर, गजानन भागवत, राकेश पाटोळे आदी यावेळी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post