ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन


वेब टीम : लंडन
ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने (Conservative Party) दणदणीत विजय मिळवला.ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला. हुजूर पक्षासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जातो.

भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या एकूण ६५० जागांपैकी ६४२ जागांचे निकाल जाहीर झाले होते. यापैकी बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाने ३५८ जागा मिळवल्या होत्या.तर मजूर पक्षाने यापैकी २०३ जागांवर विजय मिळवला.

प्रमुख विरोधी पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी पराभव स्वीकारत पुढील निवडणुकीत पक्षाचे नेतृत्त्व करणार नसल्याचे ही जाहीर केले. मजूर पक्षाने १९३५ नंतरच्या सर्वात मोठ्या पराभवाकडे वाटचाल केली आहे.

तर दुसरीकडे हुजूर पक्षाने १९८७ नंतरचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. २०१७ च्या निवडणुकीत हुजूर पक्षाला ३१८, तर मजूर पक्षाला २६२ जागा मिळाल्या होत्या.

हुजूर पक्षाला एकूण मतांपैकी ४३.५ टक्के मते मिळाली. यात स्कॉटलंडमधून २५ टक्के, तर इंग्लंडमध्ये ४७ टक्के मते मिळाली. तर मजूर पक्षाला ३२.४ टक्के मते वाट्याला आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post