धक्काबुक्की करत दुचाकीस्वाराला लुटले


वेब टीम : अहमदनगर
दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी जाणार्‍या व्यावसायिकास मोटारसायकलवरील तीन अनोळखी इसमांनी रस्त्यात अडवून धक्काबुक्की करीत दुचाकीस्वारास लुटले. ही घटना शुक्रवारी (दि.13) रात्री साडेनऊ वाजता पत्रकार चौकाजवळ, मनमाड रोड येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की, कमलेश अमरलाल आहुजा (रा.द्वारकानगर, प्रथम बंग्लोज, चिंतामणी हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड) हे त्यांचे एमजी रोडवरील ‘आहुजा लुंगी’ नावाचे कपड्याचे दुकान बंद करुन आपल्या एम.एच.16, डब्ल्यू.7967 नंबरच्या दुचाकीवरुन राहते घरी बालिकाश्रम रोडकडे जात असताना पत्रकार चौकाजवळ मोटारसायकल वरुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबविले.

तिघांनी आहुजा यांना धक्कबुक्की केली. त्यांच्याकडील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असलेली बॅग व हातातील अंगठी असा ऐवज बळजबरीने चोरुन नेला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी कमलेश आहुजा यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नेांद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post