नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड


वेब टीम : पुणे
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर मध्यवर्ती नाटय परिषद नियामक मंडळाच्या बैठकीत रविवारी शिक्कामोर्तब झाला.

नियामक मंडळाच्या बैठकी आधीच डॉ. पटेल यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्या घोषणेवर काही शाखा आणि नियामक मंडळाच्या सदस्यांनी अक्षेप घेतला होता. या घोषणे विरोधात काही सदस्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

तसेच धर्मादाय आयुक्ताकडेही तक्रार केली होती. त्यामुळे बैठकीत अध्यक्ष निवडीवरुन वाद होणार हे निश्चित होते.कदाचित या बैठकीत नियामक मंडळाच्या सदस्यांचे मतदान घेऊन फेर निवड केली जाणार की काय? अशी चर्चा नाट्यक्षेत्र वर्तुळात रंगली होती.

शंभराव्या नाट्य संमेलन अध्यक्ष पदासाठी नाट्य परिषदेच्या शाखांनी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व ज्येष्ठ दिग्दर्शक डा. जब्बार पटेल यांच्या नावाची शिफारस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे केली होती.

मात्र बैठकी आधीच नाट्य संमेलन अध्यक्ष म्हणून डा. जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आज झालेल्या बैठकीत निवडीच्या वादावर पडदा पडला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post