मी सामना वाचत नव्हतो पण आता सबस्क्रिप्शन लावले : विरोधीपक्षनेते फडणवीस


वेब टीम : नागपुर
काँग्रेससोबत जाऊ हा शब्द बाळासाहेबांना शिवसेनेने दिला होता का? असा प्रश्न विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्यात सर्वात जास्त जागा भाजपाला मिळाल्या. १९९० नंतर भाजपाला दोनवेळा १०० पेक्षा जागा मिळाल्या.

मात्र हे सरकार हाराकिरीचे सरकार आहे असाही टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नागपूर अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती.

या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना’मधले पवारांबाबतचे उल्लेख वाचून दाखवले. ज्यामुळे गदारोळ झाला.

मी सामना वाचत नव्हतो पण आता सबस्क्रिप्शन लावले. पवारांबाबत काय काय बोलले गेले, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोलले गेले? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे असे म्हणताच गदारोळ झाला. त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच टोले लगावले.

ज्यावरुन शिवसेनेचे आमदार, मंत्री हे चांगलेच चिडले. माझा वेळ हेच लोक खात आहेत, माझ्या आरोपांना उत्तर देऊन असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होते की आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत. त्याचा सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे.

२५ हजार हेक्टरी मदत कोरडवाहू शेतीला आणि ५० हजार रुपये हेक्टर बागायती शेतीला देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. अल्प भूधारक,अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना हे आश्वासन दिले होते.

त्याचे काय झाले? तुम्ही दिलेला शब्द तुम्हीच पाळला नाही. तुम्ही केंद्र सरकारला मदत मागितली होती पण घोषणा केंद्र सरकारच्या जीवावर केली होती का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post