एकेकाळी होता राष्ट्रपती; आता त्याच देशात झाली मृत्युदंडाची शिक्षा


वेब टीम : लाहोर
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयाने आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत.

त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. ‘मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगाने येऊन पाहावे’, असं ते म्हणाले होते.

मुशर्रफ यांनी 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी लादली होती. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डिसेंबर 2013 मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता. त्यानंतर 31 मार्च 2014 मध्ये मुशर्रफ यांना आरोपी घोषित करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post