खुशखबर : 'या' आजारांचे निदान आता होणार लवकर; आली खास पद्धत


वेब टीम : वाशिंग्टन
बर्‍याचदा आजाराची लक्षणे न समजल्याने अथवा आजाराचे निदान वेळेवर न झाल्यामुळे रुग्ण दगावतात. हे प्रमाण जगभरात बरेच लक्षणीय आहे.

उतारवयात होणार्‍या मेंदूच्या काही विकारांमध्ये अल्झायमर्स, डिमेन्शियासारख्या विस्मृतीशी संबंधित आजारांचा समावेश आहे.

या आजारांवर कोणताही उपचार नसला तरी वेळीच त्याचे निदान झाल्यास काही अटकाव निर्माण करता येणे शक्य आहे मात्र त्याची लक्षणे कळायला हवीत.

संशोधकांनी एका रक्त चाचणीच्या आधारे 16 वर्षे आधीच डिमेन्शियाची लक्षणे ओळखली जाऊ शकतात, असा दावा केला आहे.

या रोगाची चाहूल लागण्यापूर्वीच तो रोखण्यासाठी योग्य उपचार करता येणे शक्य होईल. प्रोटिन्सचाही छडा लावण्याचे इंगित कळाले.

डिमेन्शियामध्ये एका विशिष्ट प्रोटिनचा स्तर वाढतो, हे आधीच संशोधकांना समजले होते. हे प्रोटिन मेंदूच्या पेशींमधून सेरेब्रोस्पायनल फ्लुडमध्ये पोहोचतो मात्र या प्रोटिनचा छडा कसा लावावा, हे संशोधकांना माहिती नव्हते.

आता रक्ताच्या चाचणीतूनही त्याचा कसा छडा लावता येतो हे त्यांना समजले आहे. शिवाय त्याचा स्तर वाढत चालला असल्याचेही यामधून दिसून येऊ शकते.

सेंट लुईमध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिकल येथील संशोधकांच्या एका पथकाने या बाबतची रक्त चाचणी विकसित केली आहे. प्रोटिनची चाचणी करणारी ही रक्त चाचणी मध्यम वयात केली जाईल. यामुळे अल्झायमर्स, डिमेन्शिया वा अन्य न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डरचा छडा लावता येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post