तळघरात चालत होते हुक्का पार्लर; पोलिसांनी टाकला छापा


वेब टीम : अहमदनगर
येथील न्यु टिळक रोडवर असणार्‍या एका बिल्डींगच्या तळघरात बेकायदा हुक्का पार्लर चालु असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी केलेल्या छापा कारवाईत एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.16) रात्री 10 च्या सुमारास करण्यात आली.

दिनेश दत्तात्रय खरपुडे (वय 28, रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा) हा काही नागरिकांना तंबाखुजन्य पदार्थ हुक्का ओढण्यासाठी पुरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांना सुचना दिली.

त्या सुचनेवरून पोलिसांनी न्यु टिळक रोडवरील या दुकानावर छापा टाकला असला तेथे एक इसम तेथे आलेल्यांना तंबाखुजन्य पदार्थ हुक्का ओढण्यासाठी पुरवित असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला जागीच पकडले असता व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिनेश दत्तात्रय खरपुडे असे सांगितले.

या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, तंबाखुजन्य पदार्थ, अल् फकिर नावाच्या कंपनीचे वेगवेगळ्या फ्लेव्हरचे 8 डब्बे व हुक्का ओढण्याचे 6 पॉट असा 17 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी खरपुडे याच्या विरूध्द सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम 2013 चे कलम 4 (क), 21 (क) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पवार हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post