झारखंडमध्ये भाजपला बसणार पराभवाचा झटका; एक्झिट पोल त्याच दिशेने


वेब टीम : रांची
झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर रोजी लागणार असून, या पार्श्वभूमीवर विविध वृत्तवाहिन्या व माध्यम संस्थांनी मतदानोत्तर चाचणीव्दारे निकालाचे अंदाज जाहीर केले.

मतदानोत्तर चाचणीनुसार झारखंडमध्ये भाजपच्या पराभवाची चिन्हे आहेत. तर राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेची संख्या ८१ असून बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे.

टाइम्स नाऊच्या मतदानोत्तर चाचणीमध्ये जेएमएम-काँग्रेस आघाडीला ४४ जागेवर, तर भाजपला २८ जागा दाखवण्यात आल्या आहेत. इतरांना ९ जागा मिळण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post