पंतप्रधान मोदींनी आणली अशी योजना; प्रत्येक घराला मिळणार पाणी


वेब टीम : दिल्ली
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. तसेच त्यांनी शेतकरी,तरुणांना ‘पाणी वाचवा’ असे आवाहन केले. दिल्लीच्या विज्ञान भवनात त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल भूजल योजनेचा शुभारंभ केला. यावेळी मोदी यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. ‘या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात येईल. तसेच ज्या भागांतील पाणीपातळीत मोठी घट झाली किंवा वेगाने घट होत आहे, अशा भागांत विशेष लक्ष दिले जाणार आहे,’ असे मोदी म्हणाले.

मोदी यांनी यावेळी आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली. हिमाचल प्रदेशला लेह-लडाखशी जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याला ‘अटल बोगदा’ असे नाव देण्याची घोषणा केली. हा बोगदा सुरक्षेसह पर्यटनाच्या दृष्टीने ही महत्वाचा आहे.

पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात होणारी घट होत आहे. त्याबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. ‘मी जेव्हा पंजाबमध्ये काम करत होतो, त्यावेळी पाणीपातळी वाढल्याने शेतीचे नुकसान होत असल्याची चर्चा व्हायची.

पण वीस वर्षांनंतर पाणीपातळीत इतकी घट झाली आहे की, त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे अशी चर्चा होत आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी जी धोरणे अवलंबणे गरजेचे होते, ती राबवण्यास मागील सरकारे अपयशी ठरली आहेत,’ असे ही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post