कांद्याने आमदारांचीही पंचाईत; खायला काकडी आणि गाजर


वेब टीम : नागपूर
राज्यातील जनतेला कांदा रडवत असताना त्याची झळ आता आमदारांना सुद्धा बसताना दिसते. हिवाळी अधिवेशनाला सर्व आमदार नागपुरात आले आहेत

आमदार निवासाच्या उपहारगृहातून कांदा गायब असल्याचे चित्र आहे.कांद्याची जागा आता काकडी आणि गाजराने घेतली आहे.

सामान्य ग्राहकासाठी बाजारात उपलब्ध कांद्याचे दर अजूनही आवाक्याबाहेर आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा अजूनही गायबच आहे.

आता तर राज्याच्या कारभाराचा गाडा ओढणाऱ्या आमदारांच्या जेवणातूनही कांदा गायब दिसतो.हिवाळी अधिवेशनासाठी सर्वच पक्षाच्या आमदारांनी आपला मुक्काम नागपुरात ठोकला आहे.

काही आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी असले तरी बरेच आमदार आणि त्यांचे स्वीय सहायक यांचा मुक्कम आमदार निवसावरच आहे.

नागपूर सहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. नवीन सरकारच्या स्वागताचे संपूर्ण शहरात फलक लागले आहेत.आमदार निवासाची रंगरंगोटी पूर्ण झाली असून नवीन आमदारांना सदनिकांचे वाटप केले आहे.

काही आमदारांचे पहिलेच अधिवेशन असल्याने खास आमदार निवसातील भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.आमदार निवासामध्ये खास सवलतीच्या दरात भोजन मिळते. त्यामुळे जेवणासाठी आमदारांच्या बरोबर कार्यकर्त्यांची गर्दी होताना दिसते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post