वेब टीम : दिल्ली कांद्याच्या वाढत्या किंमतींपासून त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आता लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. ग्राहक म...
वेब टीम : दिल्ली
कांद्याच्या वाढत्या किंमतींपासून त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आता लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१ डिसेंबरनंतर आयात केलेले कांदे आता एक-दोन आठवड्यांत बाजारात येतील.
महाराष्ट्र आणि गुजरात येथून नवीन कांद्याच्या पिकाची आवकही वेगाने होणार असल्याचे समजते.याशिवाय एमएमटीसीमार्फत ३० हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता या कांद्याची आयातही येत्या २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कांद्याच्या वाढत्या किंमतीला डिसेंबरच्या मध्यावर आळा बसेल. डिसेंबर अखेर कांद्याचे दर खाली येतील असे समजते.
याचे कारण म्हणजे कांदयाची आवड वाढल्यामुळे मग कांद्याची मागणी आणि पुरवठा यातील फरक अतिशय कमी झाल्यामुळे असे होईल असे सरकारी अधिकारी म्हणाला. देशात कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत सांगितले होते.
या दरवाढी नंतर त्याच्या निर्यातीवर बंदी आणली गेली आणि आयात करण्याचे आदेश दिल्याची माहिती तोमर यांनी दिली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितल्याचे तोमर म्हणाले.
COMMENTS