विरोधीपक्ष नेता माझा मित्रच, दोघांमध्ये अंतर ठेवायला नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


संग्रहित
वेब टीम : मुंबई
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधीपक्षनेते पदावर नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या प्रस्तावावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.

आपण गेली 25-30 वर्षे एकत्र आहोत. मित्र होते ते विरोधात बसलेत. विरोधी पक्ष सोबत आलेत. या अर्थाने खरे तर विरोधक कुणीच नाही. विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको.

कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी केले. देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर उद्धव यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यावेळी ते बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post