अल्पवयीन मुलीवरील अत्याचार: आरोपी अटकेत


वेब टीम : अहमदनगर
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव अमोल अशोक निमसे असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे काही दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची निदंनीय घटना घडली.

याप्रकरणी तपास करताना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना गुन्ह्यातील आरोपीचे नाव समजले असता पोलिसांनी त्याचे फोटे प्रसिध्दीस देऊन नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते.

नागरिकांकडुन मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आरोपी अमोल निमसे यास सिन्नर तालुक्यातील वरवंडी येथील एका तांड्यातून अटक करून कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post