मज़ा तो तब है जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो..: संजय राऊत यांचे ट्विट


वेब टीम : नागपूर
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास महिनाभर चाललेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले.

सत्तासंघर्षाच्या कालावधीत शिवसेनेची खंबीरपणे खिंड लढवणारे व सर्व राजकीय घडामोडींमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणारे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरूवातीला आपल्या अनोख्या अंदाजात एक ट्विट केले.

या ट्विटद्वारे त्यांनी … मज़ा तो तब है जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो..! असे म्हणत भाजपला टोला लगावल्याचे दिसते.

”दोस्तों में मशहूर हुए तो क्या मज़ा…मज़ा तो तब है जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो..! असे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले.

या आधीही वेळोवेळी आपल्या शायरीच्या अंदाजातून संजय राऊत यांनी राजकीय परिस्थितीवरून भाजपला टोला लगावलेला आहे. याशिवाय अग्रलेखांद्वारे देखील संजय राऊत हे टीका टिप्पणी करत असतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post