सत्ता स्थापन झाल्यावर भाजपच्या खासदारांनी माझे चोरून अभिनंदन केले : शरद पवार


वेब टीम : नागपूर
राज्यातील सत्तास्थापनेनंतर दिल्लीला गेलो असताना भाजपचे खासदार चोरून माझे अभिनंदन करत होते.  महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर इतर पक्षांचे खासदार, नेते संसद भवनात जाहीरपणे माझे अभिनंदन करत होते.

मात्र, भाजपचे खासदार, मंत्री जेव्हा भेटायचे तेव्हा ते आधी आजूबाजूला बघायचे.  कोणी पाहात तर नाही ना, याची खात्री करायचे आणि मग माझा हात हातात  घेऊन अभिनंदन करायचे, असं शरद पवार यांनी मिस्कीलपणे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन विदर्भात विस्तारण्यासाठी आणि अधिवेशनावर लक्ष ठेवण्यासाठी नागपुरात दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर झालेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला.

महाविकास आघाडी स्थानिक पातळीपर्यंत पोहचत आहे. महाविकास आघाडीतून स्थानिक पद देण्याच्या सूचना आपण आमदारांना केल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post