जनतेचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून पाशवी बळाचा वापर : सोनिया गांधी


वेब टीम : दिल्ली
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

त्या म्हणाल्या, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पाशवी बळाचा वापर करून जनतेचा आवाज क्रूरपणे दाबत आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकणे हे सरकारचे काम असते; पण हे सरकार जनभावनेचा अनादर करत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

भाजप सरकारच्या धोरणांविरोधात देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून आंदोलन सुरू आहे. मात्र हे आंदोलन चिरडण्याचा भाजप सरकार ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहे, त्याबद्दल काँग्रेसला चिंता वाटत आहे.

सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओद्वारे सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करतानाच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.

चुकीचे निर्णय आणि धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा लोकशाहीत जनतेला अधिकार आहे. लोकांचे म्हणणे ऐकणे हे सरकारचे काम आहे. त्यांनी लोकांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post