अबब : सुंदर पिचई यांना झाली तब्बल 'इतकी' पगारवाढ


वेब टीम : मुंबई
भारतीय वंशाचे ‘गुगल’ आणि ‘अल्फाबेट’ या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना कंपनीने तब्बल २ दशलक्ष डाॅलर्स (१४ कोटी रुपये) इतकी पगारवाढ दिली आहे.

‘सीएनबीसी’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या एका वृत्तानुसार सुंदर पिचाई यांची ‘टेक होम सॅलरी’ यंदा २ दशलक्ष डाॅलर्सने वाढणार आहे. त्याशिवाय पिचाई यांना १२० दशलक्ष डाॅलर्सचे शेअर्ससुद्धा दिले जातील.

 गुगलचीच मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची नुकतीच त्यांनी जबाबदारी सुंदर पिचाई यांच्या खांद्यावर आली. या जबाबदारी बरोबरच सुंदर पिचाई आता जगातील सर्वात शक्तीशाली कॉर्पोरेट व्यक्तीमत्व बनले.

गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटची धुरा पिचाई यांच्यावर सोपवली.अल्फाबेटने ‘युनायटेड स्टेटस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन’ला दिलेल्या माहितीनुसार पिचाई यांना १२० दशलक्ष डाॅलर्सचे शेअर्ससुद्धा (स्टाॅक ऑप्शन) दिले जातील.

‘गुगल’च्या अहवालानुसार सुंदर पिचाई यांचे वार्षिक उत्पन्न पॅकेज ६ लाख ५० हजार डॉलर आहे. यात झपाट्याने वाढ होत आहे. या अहवालात १२० दशलक्ष डाॅलर्सच्या शेअर्सचा पिचाई यांना कशा प्रकारे लाभ मिळणार या संदर्भातील देखील माहिती दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post