अयोध्या प्रकरण : सर्व पुनर्विचार याचिका फेटाळल्या


वेब टीम : दिल्ली
अयोध्या प्रकरणाच्या निकालाचा फेरविचार व्हावा, यासाठी करण्यात आलेले फेरविचार अर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावले. पाच सदस्यांच्या खंडपीठाने पक्षकारांतर्फे आलेले ९ आणि अन्य ९ जणांचे अर्ज काल फेटाळून लावले.

या खंडपीठात सरन्यायाधीश एस.ए.ब बोबडे, न्यायमूर्ती. डी.वाय. चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. ए.अब्दुल नजीर, आणि न्या. संज़ीव खन्ना यांचा समावेश होता. याआधीच्या खंडपीठात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगाई यांचा समावेश होता.

त्यांच्या निवृत्तीनंतर संजीव खन्ना यांचा या खंडपीठात समावेश करण्यात आला आहे. अयोध्या प्रकरणात ९ नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल आला होता. दरम्यान, निमोर्ही आखाड्याने मंदिर निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात येणार्‍या ट्रस्टमध्ये स्थान मिळावे, यासाठी फेरविचार अर्ज केला होता.

रामजन्मभूमिचा निकाल लागून एक महिना पूर्ण झाला तरीही राम मंदिर निर्माण ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याची काय भूमिका आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे न्यायालयाने याची दखल घेऊन आदेश द्यावेत, अशा मागणीचा अर्ज केला होता. तो अर्जदेखील न्यायालयाने फेटाळला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post