खुशखबर : आता मिळणार स्वस्त दरात कर्ज !


वेब टीम : मुंबई
रिझर्व्ह बँकेने रेपो दर ‘जैसे थे’च ठेवले असले तरी बँकांकडून मात्र हळूहळू व्याजदर कमी केले जात आहे. स्टेट बँकेच्या कर्जदर कपातीनंतर एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांनी कर्जदर (MCLR) कमी केले.

यामुळे ग्राहकांना कमी व्याजदरात या बँकांकडून गृहकर्ज तसेच इतर कर्जे मिळणार आहेत. स्टेट बँकेने नुकताच कर्जदर (MCLR)०.१० टक्क्याने कमी केला होता. एक वर्षासाठीचा स्टेट बँकेचा MCLRआता ८ टक्क्यावरून ७.९० टक्के झाला.

चालू वर्षात सलग आठव्यांदा MCLR मध्ये कपात केल्याचा दावा स्टेट बँकेने केला. व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी बँका आता सक्रिय होत आहेत. एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये ०.१५ टक्के कपात केली.

या व्याजदर कपातीमुळे एचडीएफसी बँकेचा कर्जदर ८.१५ टक्के झाला आहे. त्याआधी तो ८.३० टक्के होता. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने ठेवीदरांमध्ये ०.०५ ते ०.१० टक्क्याची कपात केली आहे. त्याशिवाय कर्जदर ०.०५ टक्क्यांनी कमी करून तो ८.२० टक्के केला.

बँक ऑफ इंडियाने कर्जदरात ०.२० टक्क्याची कपात केली असून तो ७.७५ टक्के केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी व्याजदरात या बँकांकडून गृहकर्जे तसेच इतर कर्जे मिळणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post