'हा' प्रकार झाला आणि विराटच्या रागाचा पारा चढला

फाइल फोटो

वेब टीम : चेन्नई

भारत विरुद्ध झालेल्या पहिल्या एक दिवसाच्या सामन्यात वेस्ट इंडिजने सहज विजय मिळवला असला तरी या सामन्यातील एका घटनेवर कर्णधार विराट कोहली भडकला आहे.

चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विंडीजने ८ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचा निर्णय घेतला.भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पण त्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी शतकी भागिदारी करून संघाला २००च्या पुढे नेले.

पण अय्यर आणि पंत यांची जोडी बाद झाल्यानंतर मात्र तळातील फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभी केली नाही. ४८व्या षटकात रविंद्र जडेजा धावबाद झाला.

जडेजा बाद झाल्या मैदानातील पंचांनी वेस्ट इंडिजची मागणी फेटाळली. पण त्यानंतर थर्ड अंपायरने जडेजाला बाद दिले.४८व्या षटकात रविंद्र जडेजा धाव घेत असताना रोस्टर चेजने मारलेला थ्रो विकेटला लागला.

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना बाद झाल्याची अपिल केली. पण मैदानातील अंपायने बाद दिले नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने अंपायर्सशी चर्चा केली.

या दरम्यान ड्रेसिंग रूममधून पोलार्डला सांगण्यात आले होते की, जडेजा बाद आहे आणि त्याने अंपायर्सशी जाऊन बोलले पाहिजे. पोलार्डने मागणी केल्यानंतर थर्ड अंपायरची मदत घेतली आणि जडेजा बाद ठरवले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post