बँकांचे कर्मचारी जाणार दोन दिवस संपावर


वेब टीम : मुंबई
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत.भारत बंदमध्ये सहभागी झाल्यानंतर आता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसाच्या राष्ट्रीय संपाची हाक दिली.

येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे लाखो कमर्चारी संपावर जाणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार असून याच दिवशी सरकारी बँकांचा संप असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ३१ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. १ फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे.

मात्र बजेटच्या दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे बँकेच्या व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इंडियन बँक असोसिएशनसोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post