नाशिक : सिंचन व बिगर सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश


वेब टीम : मुंबई
नाशिक विभागातील रब्बी  व उन्हाळा हंगामासाठी सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, असे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागातील रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, पालखेड डावा कालव्यावर रब्बी हंगामात सिंचन/बिगर सिंचनाचे 2 आवर्तने देण्याचे नियोजन. उन्हाळा हंगामामध्ये बिगर सिंचन व आकस्मिक आरक्षणाचे 1 आवर्तन व जून अखेरीस पावसाळ्याने ओढ दिल्यास येवला, मनमाड 38 गावे यांच्यासाठी 1 आवर्तने देण्याचे ठरले आहे.

ओझरखेड कालव्यावर रब्बीचे 2 आवर्तन देण्याचे नियोजन. रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासोबत आकस्मितचे आवर्तन देण्याचे नियोजन आहे.

दारणा प्रकल्प गोदावरी कालव्याचे रब्बी हंगामात 1 आवर्तन व उन्हाळा हंगामात उपलब्ध पाण्यातून 3 आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात यावे.

गंगापूर प्रकल्प नाशिक डावा कालवा रब्बी हंगामात 2 व उन्हाळा हंगामात 3 आवर्तने देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

कडवा प्रकल्प कडवा उजव्या कालव्यास रब्बी हंगामात 2 व उन्हाळा हंगामात पिण्याचे 1 आवर्तन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

चणकापूर प्रकल्प-गिरणा डाव्या व उजव्या कालव्यास रब्बी हंगामात 1 आवर्तनाचे नियोजन आहे. तसेच सिंचन व बिगर सिंचन आवर्तन एकत्रितपणे नियोजन करुन होणाऱ्या बचतीतून मर्यादित क्षेत्रासाठी उन्हाळ्यात 1 आवर्तन द्यावे.

यावेळी खासदार भारती पवार, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, आशुतोष काळे, लहूजी कानडे, राहूल डिकळे, हिरामण खोसकर, श्रीमती सरोज आहेर, नरहरी झिरवळ, दिलीप बनकर, नितीन पवार, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका आहेरराव व अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post