'यामुळेच' राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली : काँग्रेसचा आरोप

file photo

वेब टीम : मुंबई
राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानेच त्यांनी आपली भूमिका बदलली, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणातून भाजपाच्या भूमिकेच्या समर्थनाचे संकेत मिळाल्याने काँग्रेसचा तिळपापड झाला आहे.

सचिन सावंत म्हणाले की, राज ठाकरे यांनी गेल्या १४ वर्षांत अनेकदा सोयीनुसार भूमिका बदलली आहे. त्यांनी २००८ ला मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू केले.

२०१३ साली त्यांनी गुजरातचा दौरा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडले. २०१६ साली त्यांनी मोदींचा विरोध करणे सुरू केले.

आता ते मोदींची स्तुती करतील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास सावंत यांनी विरोध केला.

याबाबत भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपाचे सावरकरप्रेम दिखाऊ आहे. मात्र, याबाबत ते जास्त बोलले नाहीत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post