शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद; मुख्यमंत्री घेणार बैठक


वेब टीम : परभणी
जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे साईबाबा त्यांच्या जन्मस्थानावरुन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. पाथरी या जन्मस्थळाला शिर्डी ग्रामस्थांचा विरोध आहे.

या पार्श्वभूमीवर पाथरीकरांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी साई मंदिरात बैठकीचे आयोजन केलं आहे. दरम्यान, शिर्डी ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेण्यासाठी बैठक घेण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शविली आहे.

पाथरी येथील साई जन्मभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर शिर्डीतून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी येथील साईभक्त आक्रमक झाले असून आज साई मंदिरात आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकी आयोजन केले आहे.

20 वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनानंतर पाथरी हे श्री साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध झाले आहे. मागील काही वर्षांत राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू इ. भागातून साईभक्त येथे दर्शनासाठी येतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post