इतक्यातच महाराष्ट्रात निवडणुका लागणार नाहीत; एकनाथ खडसे


वेब टीम : मुंबई
सरकार पडावे म्हणून आम्ही काही वाट पाहात बसलेलो नसून हे सरकार आपसातल्या वादामुळेच कोसळणार आहे. त्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सावध राहिले पाहिजे.

असे झालेच तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत भाजप नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे. मात्र पुढील काही महिने तरी महाराष्ट्रात निवडणुका लागणार नाहीत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

भाजप सरकारच्या काळात अशा घटना घडल्या असतील तर दुर्दैव असल्याचे सांगत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आता फोन टॅपिंगच्या चौकशीची मागणी करत भाजपवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस हे आपले सहकारी असून ते केंद्रात मंत्री होणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. दिल्लीने एकदा सांगितले की, केंद्रात येण्याचा मार्ग सुकर होतो, पक्षाचा आदेश अंतिम असतो.

आपल्याबरोबर काम करणारा नेता जर केंद्रीय मंत्रिमंडळात असेल, तर महाराष्ट्राला त्याचा चांगला उपयोग करून घेता येईल. त्याबाबत मला समाधानच वाटेल. वरिष्ठांना जर वाटले किंवा केंद्रीय नेतृत्वाने जर आदेश दिले तर ते केंद्रामध्ये जाऊ शकतील.

देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचेही समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post