तुमच्या हृदयाचे ठोके किती असायला हवेत माहिती आहे का?


वेब टीम : मुंबई
छातीवर हात ठेवल्यास आपल्याला हृदयाच्या आकुंचन-प्रसरणाची जाणीव होते. छातीला कान लावून वा स्टेथोस्कोपने आपण हृदयाचे ठोके ऐकू शकतो.

हृदय किती वेळा आकुंचनप्रसरण पावते, म्हणजेच हृदयाचे किती ठोके पडतात हे मोजूही शकतो.

हृदयातील रक्तदाब हा सर्व रक्तवाहिन्यात पोहोचत असल्याने धमन्यांवर बोट ठेवले तर त्या विशिष्ट लयीत वर खाली होताना जाणवतात.

सामान्यतः मनगटातील धमनी हाताला लागण्याचा दर (नाडीचा दर) हा हृदयाचा ठोक्यांइतकाच असतो. सामान्यपणे हृदयाचे दर मिनिटाला 60 ते 120 इतके ठोके पडतात.

मात्र खेळाडूंमध्ये विश्रांतीच्या अवस्थेत हा दर 40 इतका कमी व खूप वेगवान खेळ करत असताना 180 ते 200 इतका जास्त असू शकतो. मात्र विश्रांतीच्या अवस्थेत हृदयाचे ठोके मिनिटाला 120 पेक्षा जास्त असणे हे रोगाचेच लक्षण समजावे लागेल.

सामान्यपणे व्यायाम व मेहनतीची कामे करताना, खूप घाबरल्यास, मानसिक ताण पडल्यास वा अंगात ताप असल्यास छातीचे ठोके वाढतात.

 फुप्फुसात द्रव गेल्याने होणारा न्यूमोनिया, गळ्यातील थायरॉईड ग्रंथीचे थॉयरॉक्सीन हा स्त्राव जास्त निर्माण करणारे विकार, हृदयाच्या गतीवर नियंत्रण ठेवणार्‍या केंद्राचा विकार, मेंदू सांसर्गिक रोग, रक्तातील ग्लुकोजचे कमी झालेले प्रमाण या सर्वांमुळे हृदयाचे ठोके वाढतात.

हृदयाचे ठोके खूप वाढल्याने छातीत धडधडल्यासारखे होते व जीव घाबरा होतो. असे झाल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा व हृदयाचे ठोके का वाढले आहेत. ते शोधून उपचार सुरु करावेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post