जागतिक कर्करोग दिन : हाडे दुखताहेत, सूज आली आहे? हाडांचा कॅन्सर तर नाही ना?

representative image

वेब टीम : मुंबई
तुमची हाडे दुखत आहेत. हाडांना सूज आली आहे. ही बाब तुम्हाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण हा प्रकार म्हणजे हाडांच्या कॅन्सरची सुरुवातही असू शकते. चला जाणून घेऊयात हाडांच्या कॅन्सरविषयी.

हाडांचा आजार असलेल्यांना आणि रेडिएशन घेतलेल्यांना हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा कॅन्सर तीन प्रकारचा असतो.

ऑस्टिओजेनिक सार्कोेमा प्रकारात लहान मुलांच्या किंवा तरुणांच्या मांडीचे हाड, पायाचे हाड किंवा दंडाचे हाड या ठिकाणी तो होतो.

एविंग सार्कोभा प्रकारही लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही आढळतो. कमरेचे हाड, मणका किंवा पाठीचे हाड, डोक्याचे हाड व इतर चपट्या हाडांमध्ये तो आढळतो. कोन्ड्रोसार्कोमा प्रकार वृद्धांमध्ये आढळतो, यात कमरेच्या, मांडीच्या किंवा खांद्याच्या हाडाला ही व्याधी जडलेली दिसते.

हाडात दुखणे, सूज येणे ही लक्षणे यात दिसतात. काही रुग्णांच्या हाडात गाठ दिसते. कॅन्सरग्रस्त हाड अशक्त असल्याने लहानशा आघातानेही तुटते व हा आजार लक्षात येतो.

त्याशिवाय वजन कमी होणे, भूक न लागणे, खोकला होणे ही चतुर्थ अवस्थेतील कॅन्सरची लक्षणे असतात.

रक्ताच्या तपासणीद्वारे रक्तातील अनेक घटकांची तपासणी करण्यात येते. क्ष-किरणांद्वारे हाडाच्या दुखणार्याह भागाची पाहणी करण्यात येते. पूर्वी भूल देऊन बायोप्सी करण्यात येत असे.

आता ऑपरेशन न करता, सुईने गाठीचा तुकडा तपासणीसाठी काढण्यात येतो. सीटी-स्कॅन, बॉनस्कॅन व अन्य तपासण्यांद्वारे याची लागण किती झाली आहे, हे तपासले जाते.

पूर्वी या कॅन्सरमध्ये हात, पाय हे संपूर्ण अवयवच काढून टाकले जात. आता विकसित उपचारांमुळे रुग्णाचे अवयव वाचविण्यात कॅन्सर तज्ञांना यश आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post