जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हिंगणघाट प्रकरणातील पीडितेवर अंत्यसंस्कार


वेब टीम : वर्धा
महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. गेल्या सोमवारी ही घटना घडली होती. सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक तरुणीवर उपचार करत होते.

मात्र, आज (सोमवार) अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. सरकारकडून महतिचे लेखि आश्वासन मिळाल्याशिवाय अत्यंसंस्कार करणार नसल्याची पीडितेच्या कुटुंबियांची भूमिका होती.

अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली होती.

तसंच काहीजणांनी दगडफेकही केली. नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post