मोटारसायकल झाली स्लिप; एकाचा मृत्यू

representative image

वेब टीम : अहमदनगर

भरधाव वेगात जेजबाबदारपणे मोटारसायकल चालविणार्‍या मोटारसायकल स्वाराकडून मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात चंद्रकांत किसन पवार (वय 36, रा.धनगरवाडी, जेऊर) याचा मृत्यू झाला.

ही घटना शिराळ चिचोंडी येथे जेऊर रोडवर कोल्हार घाटात घडली.

चंद्रकांत किसन पवार हा त्याची टिव्हीएस स्पोर्टस् मोटारसायकल (क्र.एम.एच.17, सी.जी. 0397) वरुन शिराळ चिचोंडी ते जेऊर रोडवर वेगात जात असताना कोल्हार घाटात मोटारसायकलला झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी किसन पवार यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 304 अ 279 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक अनिल आव्हाड हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post