बच्चू कडू हे वाघ; ठाकरे सरकारमध्ये शोभून दिसत नाहीत : निलेश राणे

file photo

वेब टीम : मुंबई
बच्चू कडू, तुमच्यासारखा वाघ या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात. मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता ? राजीनामा देऊन वेगळे व्हा- असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.

दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणे असल्याचे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचारही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणे असल्याचे म्हणत आपल्याच सरकारला टोला लगावला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू आज आळंदी येथे वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी बच्चू कडू यांना या सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन करत ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post