भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : शिवसेनेचं टिकास्र

representative image

वेब टीम : मुंबई
सदानकदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही, हा जो अहंकार असतो तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. आपची सत्ता जी पाच वर्षं होती, ती दिल्लीतल्या लोकांनी मान्य केलेली आहे.

भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेलं आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत. तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वांत  महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे.

केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत. परंतु ‘आप’लाही यंदा गेल्या वेळच्या तुलनेत अपेक्षित यश मिळालेलं नाही. शिवसेनेनंही यावर  प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीला दिल्लीतल्या लोकांनी नाकारलेलं आहे, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post