अर्थसंकल्प : कृषीसाठी सौर पंप बसवण्यात येणार; जिल्हा क्रीडा संकुलांचा निधी वाढवला


वेब टीम : मुंबई
अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळी शेतकर्‍यांवर बोलताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, ऊसासह इतर पिकांकरिता ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकर्‍यांना 80 टक्के अनुदान दिले जाते.

आतापर्यंत केवळ ठराविक तालुक्यांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यभर लागू केली जाणार आहे.

यासोबतच, शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुण्यात ऑलिम्पिक भवन बांधले जाणार आहे.

सोबतच, जिल्हानिहाय क्रीडा संकुलांसाठी केला जाणारा खर्च 8 कोटी रुपयांवरून वाढवून 25 कोटी रुपये केला जाणार आहे.

बालेवाडी येथे नवीन विद्यापीठाची स्थापना करणार आहे.

पुण्यातील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना केली जाईल.

येथे कब्बडी, कुस्ती, खो-खो, व्हॉलिबॉल इत्यादी क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post