विमानतळाचे नाव बदलले आता औरंगाबाद शहराचे नाव कधी बदलणार ? : आशिष शेलार


वेब टीम : मुंबई
औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’, करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

या निर्णयाचे स्वागत करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी, महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडणारा सवाल केला आहे.

औरंगाबादचे नाव कधी बदलणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या विमानतळ नामकरण निर्णयाचे स्वागत आज भाजपाने केले.

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिल्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानलेत.

गुरुवारी माध्यमांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले, विमानतळाच्या नामकरणाला मान्यता दिली, हे चांगलेच झाले.

आता, औरंगाबादचे नाव कधी बदलणार? कारण त्यावरून राज्य सरकारला पळ काढता येणार नाही, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post