पेट्रोल- डिझेल कर वाढविल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणतात; महाराष्ट्राची जनता आम्हाला समजून घेईल


वेब टीम : मुंबई
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत.

आमचे सरकार केवळ नावापुरते महाविकास आघाडी सरकार नाही.

राज्याचा महाविकास कसा होईल या दृष्टीने पावले टाकत आहेत.

देशातील आर्थिक मंदी, कोरोना यांसारख्या संकटात अर्थसंकल्प सादर करणे आव्हानात्मक होते.

या अर्थसंकल्पात सगळ्याच घटकांचा विचार करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षात आपले देशात आणखी पुढे नेऊ.

मुख्यमंत्री म्हणाले की, 2 लाखांपर्यंत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देऊ अशी नागपूर अधिवेशनात घोषणा केली होती.

ती आता पूर्णत्वास येत आहे. 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना वन टाइम सेटलमेंट प्रमाणे योजना आणणार आहोत.

पेट्रोल आणि डिझेलवरचा अतिरिक्त कर वाढवण्यात आला. सगळं सांभाळून घेताना एवढं करावं लागतं.

महाराष्ट्राची जनता आम्हाला समजून घेईल, मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले योजनेची फक्त घोषणाच नाही तर ती लागू केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post