वेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...
वेब टीम : कोची
केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता.
गुरुवारी रात्री तो कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला.
लगेच त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले होते.
कोरोनाच्या एका संशयित रुग्ण युवकाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.
पहिल्या रक्त चाचणीत त्याला कोरोनाचा आजार नसल्याचे सांगण्यात आले होते.
पण लक्षणे मात्र कोविड-१९ ची असल्याने त्याला एर्नाकुलमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्या युवकाचे पार्थिव वेगळे ठेवण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार, यावरचा निर्णय दुसऱ्या सॅम्पल टेस्टनंतरच घेतला जाऊ शकतो.
या संदर्भात शनिवारी आरोग्य अधिकाऱ्यांनी एक बैठक झाली.
बैठकीत नमुना तपासणीसाठी सॅम्पल पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला.
अलापुझाच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या (NIV)पहिल्या अहवालानुसार, या तरुणाला कोविड-१९ ची लागण झाली होती.
COMMENTS