ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली गुढी; केले विधिवत पूजन


वेब टीम : कोल्हापूर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर कोरोनामुक्तीची गुढी उभारली.

यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले .

ही गुढी कोरोना मुक्तीची असल्याचे सांगताना श्री मुश्रीफ यांनी जनतेला घाबरू नका, आणि खबरदारी व सावधगिरी बाळगा , असे आवाहनही केले.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, गुढीपाडवा म्हणजेच चैत्र प्रतिपदा..!

दुष्ट प्रवृत्ती व असुरांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरीत दाखल झाले .

श्री. रामप्रभू अयोध्या नगरी येताना स्वागत म्हणून अयोध्यावासीयांनी गुढ्या उभारल्या होत्या, हा इतिहास आहे.

गुढीपाडवा म्हणून हाच मंगलमय पवित्र सोहळा आपण मांगल्याच्या वातावरणात साजरा करतो.

या सणाच्या आपणा सर्वांना अंतकरणातून शुभेच्छा देताना, या सणावर कोरोनाची दाट छाया आहे, याची हुरहूरही माझ्या मनात आहे.

खरे तर आपण कुणीच कल्पना केली नव्हती, असे महाभयानक संकट साऱ्या जगाच्या दारी येऊन उभे ठाकले आहे..!

कोरोना या महाभयानक संकटाच्या रुपाने साऱ्या मानवजातीपुढेच अस्तित्वाचे आव्हान उभे आहे.

म्हणून आज गुढीपाडवा या आपल्या संस्कृतीच्या पहिल्याच सणाच्या शुभेच्छा देताना मी म्हणेन की आज कोरोना मुक्तीची गुढी उभारण्याची वेळ आली आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post