अहमदनगर : फळांचा राजा बाजारात दाखल


वेब टीम : अहमदनगर
फळांचा राजा आंबा नगरमध्ये उशिराने दाखल झाला आहे. अवकाळी पावसामुळे कमी आवक असून भावातही तेजी आहे. नगरच्या नवी पेठेतील पमनदास आहुजा या जुन्या फळांच्या पेढीमध्ये लालबाग, रत्नागिरी व देवगड या आंब्याचे आगमन झाले असल्याची माहिती पप्पू आहुजा यांनी दिली.

यंदा कोकण, रत्नागिरी, केरळ चेन्नई, बंगलोर येथे अवकाळी पाऊस झाल्याने आंबा महागला असून, भावही सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

सध्या लालबाग 2 डझन दर 800 ते 1000 तर हापूस 2 डझन 1800 ते 2000 रुपये असा असून, जशी आवक वाढेल, तशी भावात मंदी येईल, असे आहुजा यांनी सांगितले.

सध्या नवी पेठेतील नव्या दालनात ग्राहकांसाठी आंबा उपलब्ध असून, या दालनास जरूर भेट द्यावी, असे पप्पू अहुजा यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post